मुख्यमंत्री समर्थक मुन्ना यादव प्रकरणात पोलिसांचा यु- टर्न; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे

munna yadav bjp leader nagpur1

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थक मानले जाणाऱ्या भाजप नेते मुन्ना यादव यांच्यावरील हत्येचा गुन्हा पोलिसांकडून मागे घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ३०७ सारखा हेत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घेत यादव यांच्यावर ३२६ म्हणजेच किरकोळ मारहाणीचे कलम दाखवण्यात आले आहे. पोलिसांनी आज या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं.

Loading...

नागपूर पोलिसांनी घेतलेल्या युटर्नमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कॉंग्रेस नेते मंगल यादव आणि भाजपचे मुन्ना यादव गटामध्ये भाऊबीजेच्या दिवशी तुंबळ हाणामारी झाली. या राड्यात दोन्ही गटातील १५ च्यावर लोक जखमी झाले होते. दरम्यान, पोलिसांनी वेळीच देखल घेत दोन्ही गटातील लोकांवर दंगली तसेच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.

मागील वर्षी हिवाळी अधिवेशनाच्या काळात विरोधकांनी भाजप नेते मुन्ना यादववरील गंभीर आरोपांचे प्रकरण देखील लावून धरले होते. याच प्रकरणात आता साडे चार महिन्यांनंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र यामध्ये आधीच्या तुलनेत एकदम सोम्य कलम लावण्यात आल्याने पोलिसांवर राजकीय दबाव आणत असे घडवण्यात आल्याच बोलल जात आहे. दरम्यान, काँग्रेस नेते मंगल यादव यांच्या विरोधातील हत्येच्या प्रयत्नाचे आरोपही मागे घेण्यात आले असून कलम 324 नुसार किरकोळ मारहाणीचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.Loading…


Loading…

Loading...