जस्टिस लोया यांचा मृत्यू ह्रदयविकारामुळेच – नागपूर पोलीस

loya justice

टीम महाराष्ट्र देशा- जस्टिस लोया यांच्या मृत्यूविषयी बोलण्यासाठी काही संस्था आणि व्यक्ती हैराण करीत असल्याचा आरोप लोया यांच्या कुटूंबानं नुकताच केला होता त्यानंतर लोया यांचा मृत्यू ह्रदयविकारानं झाल्याचं नागपूर पोलिसांनी म्हटलं आहे. नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती मीडियाला दिली.

काही दिवसांपूर्वी लोया यांच्या कुटूंबीयांनीही पत्रकार घेवून लोया यांच्या मृत्यूबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. लोया यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यानंच झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. ‘त्यांच्यावर योग्य उपचार सुरू होते. पण दुर्देवांने त्यांच्यावर मृत्यू ओढावला. लोया यांच्या मृत्यूबाबत कोणतंही राजकारण करायचं नाही.’ असंही त्यानं सांगितलं.

कुटूंबीयांच्या सांगण्यानुसार आणि पोलीस तपासात लोया यांचा मृत्यू ह्रदयविकारानं झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही तपास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं नागपूरचे सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडके यांनी सांगितलं आहे.ज्यावेळी जस्टिस लोया यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं. त्याचबरोबर त्यांच्यावर योग्य उपचारही झाले. पण त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.