fbpx

नागपूर : संघ मुख्यालयात ध्वजारोहण

टीम महाराष्ट्र देशा – देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. मुख्यालयात सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रचारकही उपस्थित होते

दरम्यान, ७२ व्या स्वतंत्रदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लालकिल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर मोदींंनी देशाला संबोधीत केलं. २०१९ पूर्वी मोदींचं लाल किल्ल्यावरील हे शेवटचं भाषण झालं. 2022 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात किंवा शक्य झालं तर त्याआधीच भारत अंतराळात तिरंगा फडकवेल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

देश नवी उंची गाठतो आहे. आजचा सूर्योदय नवी उमंग, उत्साहाला घेऊन आला आहे, आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. ‘बीज से बाजार तक’ याअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय आहे. असं देखील ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष पदी चेतन तुपे