खड्डा असेल, तिथे मी स्वत: खुर्ची टाकून बसेन,आणि खड्डा भरून देईन-पाटील

17 जिल्ह्यातील रस्ते 100 टक्के खड्डेमुक्त झाल्याचा चंद्रकात पाटील यांचा दावा

नागपूर : चंद्रकांत पाटील पाटील यांनी खड्डेमुक्तीसाठी दिलेल्या डेडलाईनचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, अद्याप राज्यातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे . या पार्श्वभूमीवर 17 जिल्ह्यातील रस्ते 100 टक्के खड्डेमुक्त झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आजपर्यंत राज्यातील 36 पैकी 30 जिल्ह्यात आपण रस्त्यावरुन प्रवास केला. यादरम्यान, केलेल्या पाहणीत 22 हजार 795 किलोमीटरचे रस्त्यांवरील खड्डे भरल्याचा देखील दावा पाटील यांनी केला आहे .

काय म्हणाले आहेत चंद्रकात पाटील
17 जिल्ह्यातील रस्ते 100 टक्के खड्डेमुक्त झाले आहेत . राज्यातील एकूण 23 हजार 381 किमी लांबी रस्त्यावरील 22 हजार 736 रस्त्यांवरील खड्डे भरले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते खड्डे भरण्याचं काम सुरु आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत 98 टक्के रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम झाले असून, आज मध्यरात्री 100 टक्के खड्डे भरले जातील.शिवाय, जर काही ठिकाणी खड्डे असतील, तर सामान्य लोकांनी सांगावं. जिथे खड्डा आहे असेल, तिथे मी स्वत: खुर्ची टाकून बसेन, आणि खड्डा भरून देईन, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

You might also like
Comments
Loading...