अजित पवारांनी बारामतीचा गड राखला

पुणे : नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा गड राखला.  39 जागांपैकी 35 जागांवर दणदणीत विजय मिळवत भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं.

 

पुणे आणि लातूर जिल्ह्यातील 14 नगरपालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबर रोजी 2 जिल्ह्यातील 14 नगरपालिकांसाठी मतदान झालं होतं. या सर्व नगरपालिकांचा निकाल आज जाहीर झाला.

 

पहिल्या टप्प्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची पीछेहाट झाली होती. नगराध्यक्षपदांमध्ये राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत बारामतीच्या 39 सदस्यीय नगरपालिकेत बहुमत मिळविण्याबरोबरच नगराध्यक्ष निवडून आणण्याचे आव्हान अजित पवार यांच्यासमोर होतं.

 

परंतु अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीने 39 पैकी 35 जागांवर विजय मिळवलाच, शिवाय नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या पौर्णिमा तावडे यांचा विजय झाला.