14 नगरपालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष

मुंबई : नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातही भाजपला चांगलं यश मिळालं आहे. पुणे आणि लातूरच्या 14 नगरपालिकांच्या नगराध्यक्षांच्या निवडणुकीतही इतर पक्षांना मागे टाकत भाजपने मुसंडी मारली आहेय

14 पैकी 5 नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी 2 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर एका नगरपालिकेत शिवसेनेच्या नगराध्यक्षाचा विजय झाला आहे. याशिवाय उर्वरित चार नगरपालिकांचं नगराध्यक्षपद हे इतर पक्षांकडे गेलं आहे.

 

माझा जिल्हा, माझी नगरपालिका

 

या नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष

लोणावळा

तळेगाव-दाभाडे

आळंदी

उदगीर

निलंगा

 

कोणत्या नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष?

बारामती

औसा

 

काँग्रेसचे दोन नगराध्यक्ष

इंदापूर

जेजुरी

राष्ट्रवादीच्या पौर्णिमा तावडे बारामतीच्या नगराध्यक्ष

 

शिवसेनेचा एकमेव नगराध्यक्ष

जुन्नर

 

इतरांकडे चार नगरपालिकांचं नगराध्यक्षपद

दौंड – नागरिक हित आघाडी

सासवड – जनमत विकास आघाडी

शिरुर – शहर विकास आघाडी

अहमदपूर – बहुजन विकास आघाडी

You might also like
Comments
Loading...