अमिताभ बच्चन यांच्यासोबत इंग्रजीत बोलाव लागल असतं तर…, नागराज मंजुळेंनी सांगितला अनुभव

amitabh-bachchan-s-jhund-with-nagraj-manjule

पुणे : अभिताभ यांना भेटायला गेललो तेव्हा आमची अर्ध्या तासाची भेट ठरली होती, परंतु तासापेक्षा जास्तवेळ आम्ही गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत जर इंग्रजी बोलायची वेळ आली तर आम्ही आमच्या एका सहकाऱ्याला सोबत घेतले होते परंतु तशी वेळ आली नाही. सेटवर देखील अभिताभ आमच्यासोबत मिसळून गेले होते. असा मजेशीर अनुभव दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितला आहे. मराठी दिनानिमित्त जागतिक मराठी अकादमीतर्फे नागराज मंजुळे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन आज बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते

मला माझी भाषा बोलणारी पात्र सिनेमांमध्ये हवी होती. त्यामुळे माझ्या सिनेमांमधील पात्रे तशी भाषा बोलतात. पुण्यात शिक्षणासाठी आलो तेव्हा मला माझ्या भाषेचा न्यूनगंड होता. विद्यापीठात असताना इंग्रजीची भीती वाटत असे. असा अनुभव नागराज मंजुळे यांनी सांगितला.

Loading...

कुळलिही भाषा हे संवादाचे माध्यम आहे, तो आशय नाही. त्यामुळे एखाद्याची भाषा कशी आहे हे पाहण्यापेक्षा तो काय बोलतोय , त्याचा आशय काय आहे हे पाहायला हवे असे मत देखील नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, समोरचा कुठल्या भाषेत बोलतोय हे महत्त्वाचे नाही, तो काय बोलतोय हे अधिक महत्त्वाचे आहे. ज्ञान हे भाषेपेक्षा वेगळे असते. अनेकदा मराठी माणूस जर एकमेकांसोबत इंग्रजीमध्ये बोलत असेल तर समोरचा काय बोलतोय हे पाहण्यापेक्षा तो बरोबर इंग्रजी बोलतोय का याकडे अधिक लक्ष दिले जाते. समोरच्याचा आशय समजून घ्यायचा प्रयत्न केल्यास भाषेची अडचण येत नाही. अस देखील माजुले म्हणाले

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका