fbpx

राज्य सरकारचा हलगर्जीपणा : १४९ कोटींचा निधी धुळखात पडून ; नगर-टेंभूर्णी रस्त्याचे काम रखडले

करमाळा- राज्यसरकारच्या हलगर्जीपणा मुळे केंद्र सरकार कडून आलेला १४९ कोटींचा निधी धुळखात पडून असून २०१२ पासून नगर-टेंभूर्णी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अजूनही रखडलेले आहे.

अहमदनगर-टेंभूर्णी या राज्यमार्गाचे चौपदरीकरणाचे काम २०१२ मध्ये सुप्रिम कंपनीला मिळालेले होते, परंतु स्थानिक पुढारी, कंत्रातदार, शेतकरी यांच्या वादामुळे या मार्गाचे काम रखडलेल्या स्थितीत आहे.

अहमदनगर-टेंभूर्णी हा अगोदर राज्य मार्ग १४१ असा होता परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१७ मध्ये ह्या राज्यमार्गाचे ५१५/अ असे राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला आणि चौपदरीकरण च्या ऐवजी सहापदरी रस्ताला मंजुरी देऊन केंद्रातून १४९ कोटींचा निधी मंजुर केला हा निधी नॕशनल अॉथॕरीटी अॉफ इंडीया कडे वर्ग झालेला असूनही आज ही रस्त्यांचे काम रखडलेले आहे, याचे कारण म्हणजे राज्यसरकारचे हलगर्जी पणा.

केंद्रातून निधी मंजूर होऊन ही राज्य सरकारने हा नगर-टेंभूर्णी महामार्ग सहापदरी होण्यासाठी केंद्राला अद्यापही ना हरकत पत्र दिलेले नाही याचे कारण म्हणजे सुप्रिम कंपनीचे कंत्राट राज्य सरकारने रद्द केल्यामुळे सुप्रिम कंपनीने सध्या उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. त्यामुळे सुप्रिम कंपनी आणि राज्य सरकारच्या हलगर्जी पणामुळे या मार्गाचे काम रखडलेले आहे.

खराब रस्तामुळे २०० बळी
खराब झालेल्या रस्त्यामुळे आतापर्यंत जवळजवळ १५०- २०० जणांचे जीव गेलेले असून शेकडो लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे.

1 Comment

Click here to post a comment