पर्जन्यवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

अहमदनगर : गेले दोन महिने दडी मारलेल्या पावसाने शनिवारी दुपारपासून नगर जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले आहे.शनिवार,रविवार व सोमवारी पहाटेपर्यंत जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये झालेल्या पर्जन्यवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले. कधीही पाणी नसणा-या सीना नदीला देखील पुर आला होता. दरम्यान पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा व एका गायींचा मृत्यु झाला आहे.जून महिन्याच्या सुरूवातीला जोरदार हजेरी लावल्यानंतर गेले दीड ते दोन महिने जिल्ह्यातून पाऊस पूर्णपणे गायब झाला होता.त्यामुळे शेतक-यांबरोबर प्रशासन देखील चिंताग्रस्त झाले होते.मात्र हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवार दुपारपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस चांगलाच सक्रीय झाला. नगर जिल्ह्यातील पारनेर व जामखेड या तालुक्यांमध्ये तर अतिवृष्टी झाली आहे.त्याबरोबरच शेवगाव,पाथर्डी,श्रीगोंदा, अकोले,संगमनेर,नेवासे,श्रीरामपुर,कोपरगाव,राहुरी अशा सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक गावांमध्ये नदी व नाल्यांच्या पुरीचे पाणी शिरल्याने पसिसर जलमय झालेला दिसत होता. नगर शहरातून वाहणारी सीना नदी कधी नव्हे ती भरून वाहू लागली. सीना नदीला पुर आल्याने पुराचे पाणी नदीकाठावरील नागरी वस्त्यांमध्ये शिरल्याने अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी आल्याने मोठे नुकसान झाले. तसेच सातत्याने पर्जन्यवृष्टी सुरूच राहिल्याने शहरातील दिल्ली दरवाजा,नालेगाव,माळीवाडा,वाडिया पार्क,माणिकनगर,पटवर्धन चौक. चितळे रस्ता आदि शहरातील सखल परिसर पूर्णपणे जलमय झाला होता.रस्त्यांना अक्षरश: नद्यांचे स्वरूप आले होते.जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील पारनेर व जामखेड या दोन दुष्काळी तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.या दोन तालुक्यांसहीत बोधेगाव (तालुका शेवगाव),पारनेर, सुपे (तालुका पारनेर),जामखेड, खर्डा, नायगाव, अरणगाव(तालुका जामखेड),माहीजळगाव(तालुका कर्जत)व कोळगाव (तालुका श्रीगोंदा) या 9 महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.जिल्ह्यातील दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले. उत्तर जिल्ह्यातील अकोले तालुक्यासहीत अन्य तालुक्यांमध्ये पावसाचा जोर तुलनेने कमी होता.शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे घराची भिंत अंगावर पडून गोपाळ लक्ष्मण देशमुख (वय65) यांचा मृत्यु झाला. तर श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे वीज अंगावर पडल्याने उल्हास गायकवाड यांच्या गायीचा मृत्यु झाला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले