दिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात ? ; नगरचं राजकारण तापलं 

टीम महाराष्ट्र देशा : खासदार दिलीप गांधी यांचे कट्टर समर्थक उद्योजक विष्णुपंत ढाकणे यांची डॉ .सुजय विखे यांनी भेट घेत गुप्तगू केले. दोघांमधील खाजगीत झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी तुम्ही आमच्याबरोबर रहा सन्मानाची वागणूक देऊ असे जाहीर आवाहन डॉ.विखे यांनी केले. विखेंच्या दौऱ्यातील ढाकणे पिता-पुत्रांच्या भेटीमुळे तालुक्‍यात राजकीय उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे व उद्योजक विष्णुपंत ढाकणे या पितापुत्रांचा व्यवसायांबरोबरच तालुक्‍यातील पूर्व भागावरील राजकीय वर्तुळात मोठा दबदबा आहे. अनेक गावातील स्थानिक सत्ता त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांकडे आहे. खासदार दिलीप गांधी यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची जिल्ह्याला ओळख आहे. गेल्या अनेक वर्षापासून ढाकणे कुटुंबीय खासदार गांधी यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत.
 गांधी यांच्या अनेक निवडणुकीची तालुक्‍यातील सूत्रे ढाकणे पिता-पुत्र हलवतात.अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा आज तालुक्‍यातील विविध गावात विकास कामांच्या उद्घाटन संदर्भात दौरा होता. दौऱ्यापूर्वी सकाळीच डॉ. विखे यांनी उद्योजक बाबासाहेब ढाकणे व विष्णुपंत ढाकणे यांच्या राष्ट्रीय महामार्गावरील ढाकणे उद्योग समुहाला भेट देत पितापुत्राशी चर्चा केली.
IMP