‘नगर पॅटर्न’ भोवला,’त्या’ नगरसेवकांवर राष्ट्रवादी करणार येत्या पाच दिवसात कारवाई

अहमदनगर: ‘राष्ट्रवादीकडून भाजपला पाठिंबा देण्याचे आदेश नव्हते. ज्या नगरसेवकांनी भाजपला मदत केली, त्यांच्यावर येत्या पाच दिवसात कारवाई करू, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडनुकीमध्ये भाजपच्या खेळीमुळे सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावं लागणार आहे. महापौरपदाच्या निवडीत राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीची भाजपसोबत छुपी युती असल्याचा संदेश गेला होता.देशभरात भाजप विरोधी वातावरणात होत असताना नगरमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपला पाठिंबा देण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे.’पक्षाचा आदेश मानला गेला नसेल तर ते अयोग्यच. त्यामुळे पक्षादेश डावलणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,’ असं म्हणत शरद पवारांनी नगरमधील आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना इशारा दिला आहे.

You might also like
Comments
Loading...