fbpx

नगर : महागाईच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस आमदाराच्या खिशावर चोरट्यांनी मारला डल्ला

नगर – राफेल विमान घोटाळा, इंधन दरवाढ, महागाई आदी प्रश्नांवरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेसने काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात चोरट्याने काँग्रेस आमदाराच्या पैशाचे पाकीट मारल्याची घटना समोर आली आहे.

राफेल विमान घोटाळा, इंधन दरवाढ, महागाई आदी प्रश्नांवरून कॉंग्रेसने भाजपला घेरले आहे. अध्यक्ष राहुल गांधी रोज सरकारचे अपयश जनतेसमोर आणण्याच्या आटोकाट प्रयत्न करत आहेत. यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील किंवा महाराष्ट्र कॉंग्रेस कशी मागे राहिलं ? विविध मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी जिल्हा काँग्रेसने काल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला होता.

दुपारी साडेबारा ते एकच्या सुमाराला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे ५ हजार रुपये असलेले पाकीट चोरटय़ाने पळवले. मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही चोरटा पाकीटमारी करण्यात यशस्वी कसा झाला हा दिवसभर चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनला होता. विशेष म्हणजे आमदार महोदयांनी याविरोधात तक्रार देखील दिली नाही हा देखील चर्चेचा विषय बनला आहे. काँग्रेस पक्षाच्या मोर्चा दरम्यान पाकीटमारी घडल्याने होणारी चर्चा टाळण्यासाठी आ. कांबळे यांनी पोलिसांत तक्रार दिली नसावी, असा तर्क पक्षाचे कार्यकर्ते लढवत आहेत.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी मंत्रालयावर धडकू लागले – राधाकृष्ण विखे पाटील

शेतकऱ्यांबाबतच्या कोडगेपणाची सरकारला किंमत चुकवावी लागेल – विखे पाटील