नगर लोकसभेची जागा कॉंग्रेसला सोडलेली नाही – जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा: अहमदनगर लोकसभेच्या जागेवरून कॉंग्रेस – राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेली रस्सीखेच अद्याप सुरूच आहे. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी हि जागा कॉंग्रेसला दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे वृत्त तथ्यहीन असल्याचं ट्विट केले आहे.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे यांनी नगर लोकसभेतून लढण्याची जोरदार तयारी चालवली आहे. मात्र आघाडीमध्ये हि जागा राष्ट्रवादीकडे असल्याने पेच निर्माण झाला आहे.

आज अकलूज येथे बोलत असताना शरद पवार यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, गोंधळामुळे पत्रकाराने विचारलेला प्रश्न पवार यांनी नीट ऐकू गेला नाही. उत्तर देताना त्यांनी ‘कॉंग्रेस’ला असे एका शब्दात सांगितले. शरद पवार यांच्या शब्दामुळे नगरची जागा कॉंग्रेसला सोडल्याची बातमी सगळीकडे पसरली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्ताचे खंडन केले असून असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं सांगितल आहे.Loading…
Loading...