छिंदमवरून नगर भाजपमध्ये उभी फूट; खा.दिलीप गांधींच्या राजीनाम्याची मागणी

dilip-gandhi

टीम महाराष्ट्र देशा- शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा अहमदनगरमधील निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमवरून नगर भाजप मध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. छिंदमची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर अहमदनगर भाजपमध्ये उभी फूट पडली असून नगर भाजपमधील एक गट आता खासदार दिलीप गांधी यांच्यावर उघड उघड टीका करू लागला आहे त्यामुळे नगर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. सर्वांचा विरोध असतानाही मनमानी करत खासदार गांधींनी छिंदमला उपमहापौर केले असल्याचा आरोप भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अभय आगरकर यांनी केला आहे.

एका बाजूला श्रीकांत छिंदमविरोधात राष्ट्रावादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला, तर शिवसेनेनंही छिंदम यांचा पुतळा जाळून निषेध केला आहे. या क्लिपमुळे शिवसेना आणि भाजपमधला अंतर्गत तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला असताना आता खा. दिलीप गांधी यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका होऊ लागली आहे .

Loading...

नेमकं भाजप मधील दुसऱ्या गटाचं काय म्हणणे आहे

दिलीप गांधींनी आत्मपरीक्षण करावं. छिंदम हा काँग्रेस-राष्ट्रवादी विचाराचा कार्यकर्ता असून सर्वांचा विरोध असतानाही मनमानी करत खासदार गांधींनी छिंदमला उपमहापौर केला. शहर जिल्हाध्यक्ष आणि खासदार दिलीप गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा किंवा पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करावी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अभय आगरकर

दरम्यान श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडीयो व्हायरल होताच नगर शहरात याचे पडसाद उमटले . भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी श्रीपाद छिंदम याचा तीव्र शब्दात निषेध केला तसेच छिंदम यांची भारतीय जनता पार्टि व उपमहापौर पदावरुन हकालपट्टी केली .

shripad chindam

काय आहे प्रकरण?
श्रीपाद छिंदम हे अहमदनगर महापालिकेचे उपमहापौर आहेत. छिंदम यांनी त्यांच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रियमंत्री रामदास आठवले यांचा सरकारला इशारा
भाजप नेत्यानेच उपस्थित केला सवाल, उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय?