नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प येत्या २ वर्षात पूर्ण होईल: पंकजा मुंडे

राज्य सरकारडून या प्रकल्पासाठी ७७.२० करोड रुपयांचा निधी मंजूर

टीम महाराष्ट्र देशा: बहुप्रतीक्षित त्याचबरोबर बहुचर्चित असलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाला आज राज्य सरकारकडून तब्बल ७७.२० करोड रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या रेल्वेमार्गाचं काम युद्धपातळीवर विविध ठिकाणी सध्या सुरु आहे. त्याचबरोबर महत्वकांक्षी प्रकल्प येत्या २ वर्षात पूर्ण होईल अशी आशा देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा रेल्वे प्रकल्प रेंगाळलेल्या प्रक्रियेत होता मात्र मागील २ ते ३ वर्षामध्ये या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात देखील भरीव आर्थिक तरतूद केल्यानंतरच या प्रकल्पाने वेग पकडला आहे