fbpx

ICC- अमिताभ चौधरी आयसीसीच्या बैठकीत बी सी सी आयचे प्रतिनिधित्व करणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बी सी सी आयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पुढील आठवड्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद – आयसीसीच्या बैठकीत बी सी सी आयचं प्रतिनिधित्व करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मनाई केली आहे.

श्रीनिवासन यापूर्वी हित जोपासण्याच्या मुद्यावर दोषी आढळले असल्यानं त्यांना मंडळाचं प्रतिनिधित्व करता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मंडळाचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांना या बैठकीत प्रतिनिधित्व करण्याची परवानगी दिली आहे.