पुण्यात आता ‘कोरोना किलर’ उपकरण, इंडोटेक कंपनीने केला विषाणूंपासून बचावाचा दावा

pune corona

पुणे: पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्याबाहेर असून जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तर राज्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून हजारहुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशात कोरोना लसीचे संशोधन प्रगतीपथावर असल्याचे दावे होत असले तरी लस बाजारात येण्यास बराच काळ जाईल. तर पुण्यात इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स या कंपनीनं एक उपकरण विकसित केलंय. या उपकरणातून निर्माण होणारे आयन कोरोना व्हायरसपासून बचाव करु शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

या उपकरणाला कोरोना किलर असं नाव देण्यात आलंय. आयसीएमआर एनआयव्हीकडून या उपकरणाला कार्यक्षमता प्रमाणपत्र मिळाल्याचंही इंडोटेकने सांगितलं आहे. सध्या हे कोरोना किलर उपकरण नायडू रुग्णालयात ठेवण्यात आलंय. रुग्णालयानं या उपकरणाचा सकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा केलाय. हे उपकरण घर, हॉस्पिटल, शाळा, गाड्या, विमान, प्रयोगशाळा, क्वारंटाईन सेंटर, कारखाने, मंदिरे अशा कोणत्याही ठिकाणी ते वापरता येते. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या दुसऱ्या उपकरणात मास्क, रुग्णाचे कपडे, बेडशीट्स आणि इतर वापरातील कापड निर्जंतुक होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

#corona: चिंता वाढली; भारतात सलग दुसऱ्या दिवशी २८ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

कंपनीने संशोधित केलेले आणि अशा स्वरुपाची मान्यता मिळालेलं हे पहिलेच उपकरण असल्याचा दावा कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे यांनी केलाय. या उपकरणाचे दर हे आयसीएमआर आणि इंडोटेक एकत्रित ठरवणार असल्याचंही त्यांनी सांगितले. या संदर्भात पेटंट आणि ट्रेडमार्कसाठी प्रस्ताव पाठवण्यात आलाय.

दरम्यान, सध्याची परिस्थिती, कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढणारी संख्या, नागरीकांचे स्वयंशिस्तीचे पालन न करणे, तसेच प्रशासनाकडूनही ज्या सूचना आल्या होत्या, त्याचा व्यापक विचार केलेला आहे. हा निर्णय कोरोनावर मात करण्याच्या उद्देशानेच घेतला आहे. त्यामुळे त्यात एकतर्फी असायचे काही कारण नाही, असा खुलासा अजित पवार यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्यावर केला आहे.

जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये दहशतवाद्याचा खात्मा