Share

N Jagadeesan | CSK ने सोडल्यानंतर एन जगदीशनने एकाच डावात केले ‘हे’ तीन विश्वविक्रम

बेंगलोर: आयपीएल 2023 (IPL 2023) साठी रिटर्न आणि रिलीज खेळाडूंच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. यामध्ये काही फ्रॅंचाईजींनी आपल्या ठराविक खेळाडूंना संघामध्ये ठेवले आहे तर काही खेळाडूंना करारमुक्त केले आहे. त्यामुळे अनेक संघांमध्ये बदल झाल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे सर्व संघांनी कमी अधिक प्रमाणे काही खेळाडूंना करारमुक्त केल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings CSK) चा एन. जगदीशन (N Jagadeesan) हा खेळाडू लिखित यादीचा भाग नाही. यावरून असे लक्षात येते की संघाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

तामिळनाडूचा सलामीवीर जगदीशन याला CSK ने संघातून बाहेर काढल्यानंतर त्याने बेंगलोर येथील एन. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) 2022-23 सामन्यांमध्ये इतिहास रचला आहे. यामध्ये जगदीशानने अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यांमध्ये 277 धावांची शानदार खेळी केली आहे. जगदीशन आयपीएल 2022 पर्यंत चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. परंतु या फ्रेंचाईजीने डिसेंबरमध्ये होणाऱ्या आयपीएल लिलावापूर्वी त्याला सोडले आहे.

एन. जगदीशन (N Jagadeesan)  ने मोडला रोहित शर्माचा विक्रम

या सामन्यांमध्ये जगदीशनने रोहित शर्मा (Rohit Sharma) ला मागे सोडून नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. यामध्ये त्याने 196 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत 141 चेंडू मध्ये 277 धावा केले आहे. दरम्यान, त्याच्या बॅटने 25 चौकार आणि 15 षटकारही मारले आहे. या सामन्यामध्ये जगदीशनसोबत बी साईसुदर्शनने पहिल्या विकेटसाठी 416 धावांची भागीदारी केली. या खेळीनंतर जगदीशनने हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक 264 धावा केल्या होत्या. तर जगदीशनने 270 धावा करत रोहित शर्माला मागे सोडले आहे.

जगदीशनचे बॅक टू बॅक पाच शतके

या सामन्यांमध्ये जगदीशनने लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासात बॅक टू बॅक पाचवे शतक झळकावले आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या मागील चारही सामन्यांमध्ये जगदीशानने आपल्या फलंदाजीने शतक झळकावली होती.

या सामन्यांमध्ये जगदीशनचे त्रिशतक होऊ नाही शकले. परंतु असे असूनही तो अजून एका खास क्लबचा भाग झाला आहे. जगदीशन  विजय हजारे ट्रॉफीमध्ये दुहेरी शतक करणारा सहावा फलंदाज ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बेंगलोर: आयपीएल 2023 (IPL 2023) साठी रिटर्न आणि रिलीज खेळाडूंच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. यामध्ये काही फ्रॅंचाईजींनी आपल्या ठराविक खेळाडूंना …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now