वाढदिवसाच्या दिवशी आयुष्यमानने केला ‘हा’ चित्रपट पुन्हा प्रमोट

ayushman

मुंबई : पडद्यावर पहिल्याच सिनेमात समाजासमोर आगळा वेगळा विषय आणुन प्रकाशझोतात आलेल्या आयुष्यमान खुराणाचा आज वाढदिवस आहे. याप्रसंगी त्याने सोशल मीडियावर त्याचाच २०१९ला प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाबद्दल पोस्ट करत त्यात त्याने केलेल्या अभिनयाची झलक दिसत आहे.

आयुष्यमान खुराणाने ‘ड्रीमगर्ल’ या चित्रपटात फोनवर मुलीचा आवाज काढून पुरूषांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केले. त्याने ड्रीमगर्ल या चित्रपटात ‘पुजा’ नामक महिलेचे पात्र साकारत स्त्रीयाच्या आवाजत बोलला आहे. त्याच्या सोबत नुसरत भरूचा याचा समावेश होता. त्याची ही भूमिका सर्वांच्या मनोरंजनास पात्र ठरल्याचं ही त्याने सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

या केलेल्या पोस्टमध्ये त्याने ड्रीमगर्लमधील साकारलेल्या पात्रातील काही रंजक भूमिका तसेच छोट्या छोट्या क्लीप्स एकत्र करून ड्रीमगर्लला दोन वर्षपूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यात त्याने वेगवेगळया साकारलेल्या भूमिकेबद्दल बोलत मनोरंजना विषयी भाष्य केले.

महत्वाच्या बातम्या