रोहिंग्या आतंकवाद्यांनी २८ हिंदूंची हत्या केल्याचा म्यानमार सेनेचा दावा

rohingya-aatankvadi

वेब टीम :मानवतावादी दृष्टीकोणातून भारतात रोहिंग्या मुस्लिमांना राहू देण्याची मागणी होत असताना रोहिंग्या आतंकवाद्यांचा क्रूर चेहरा समोर आला आहे . म्यानमार सेनाप्रमुखांच्या वेबसाईटवर एक पोस्ट टाकण्यात आली आहे ज्यात २८ निरपराध हिंदूंची हत्या रोहिंग्या आतंकवाद्यांनी केली असल्याचा दावा करण्यात आला आहे .
अराकन रोहिंग्या सेलवेशन आर्मी (एआरएसए) च्या एका गटाने पोलीस चौकीवर हल्ला केला होता त्यानंतर सेनेने घुसखोर रोहिंग्यांच्या विरोधात मोहीम उघडली .मोहीम उघडल्यावर रोहिंग्या मुसलमानांनी वेगवेगळ्या देशात पलायन केलं . एका महिन्यात 430000 पेक्षा जास्त रोहिंग्यानी बांग्लादेश आणि इतर देशांचा आश्रय घेतला आहे . हिंसा प्रभावित राखिन प्रांतात २८ हिंदूंच्या कबरी सापडल्या आहेत . सर्व २८ जणांची हत्या रोहिंग्या आतंकवाद्यांनी केली असल्याचा दावा म्यानमार सेनेने केला आहे .
पोस्ट मध्ये काय म्हटलंय ?
सेनेला २८ हिंदूंच्या कबरी मिळाल्या असून या प्रेतांना कबरीमधून बाहेर काढण्यात आले आहे .यात २० महिला ८ पुरुषांचा समावेश आहे यापैकी ६ मुलांचे वय ८ वर्षांपेक्षा कमी आहे . राखिन प्रांतात एआरएसए अतिवादी बंगाली आतंकवाद्यानी हे हत्याकांड घडवून आणले आहे .

.