‘माझे बोलणे हिंदूविरोधी असल्याचे दूष्ट हेतूने पसरवले जात आहे’

टीम महाराष्ट्र देशा- देशातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होते, असे वक्तव्य कमल हसन यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या वक्तव्यावर नव्याने खुलासा केला आहे.

मी केवळ धार्मिक असहिष्णूतेबद्दल बोलत होतो. कट्टरता मग ती कोणत्याही धर्मातील असू दे त्याचा निषेधच केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचेही मक्कल नीधी मयम (MNM) पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी सांगितले.