‘माझा मुलगा २४-२५  वर्षांचा नाही, त्याला भाषण करता येतं’, विखें पाटलांचा पवारांना टोला

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे आपल्या पहिल्या भाषणात काहीसे अडखळले होते. यावरून ते टीकेचे धनी ठरले होते. यावरून काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ‘माझा मुलगा २४-२५  वर्षांचा नाही, त्याला भाषणही करता येतं.’ असे म्हणत विखे पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

पार्थ पवार हे त्यांच्या पहिल्या सभेमुळे चर्चेत होते. तर त्यानंतर ते सोशल मिडीयावर ट्रोल होताना दिसले. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी पळतच सभेच्या ठिकाण गाठले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पनवेल मध्ये सभेसाठी जायला उशीर होत असल्याने पार्थ पवार यांनी चक्क पळत हा परिसर गाठल्याच सांगण्यात येत आहे. मात्र ज्या सभेसाठी पार्थ पवार पळत होते मुळात तिथे सभाचं होणार नसल्याच नंतर समोर आले आहे.

Loading...

तर दुसरीकडे रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सकाळच्या वेळेस लोकलमधून उलटा रेल्वे प्रवास करुन प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे नेटकरी मंडळी पवार यांनी रिकाम्या डब्यातून प्रवास करून नक्की कोणत्या समस्या जाणून घेतल्या असे ट्रोल केले होते

दरम्यान , आज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पवार यांनी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या धर्मगुरूंची भेट घेतली त्यामुळे ते पुन्हा एकदा टीकेची धनी ठरले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई