fbpx

कालच्या गळाभेटीनंतर धनंजय मुंडेनी चिक्की घोटाळ्यावरून आज बहिणीवर साधला निशाणा

pankaja munde and dhananjay munde

पुणे: महाराष्ट्राचा राजकारणात चर्चेत असणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात बोलतांना बघितले. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दुरावलेले राजकारणातले सर्वात दिग्गज भाऊ-बहीण काल एकाच मंचावर आले. आणि चक्क त्यांनी एकमेकांची गळाभेटही घेतली. यांच्या गळाभेटीचा दुर्मिळ योग महाराष्ट्राने पाहिला. मात्र हे दोघे राजकारणात विरोधातच असल्याचे आज स्पष्ट झाले. धनंजय मुंडे यांनी चिक्की घोटाळ्यावरून पंकजा मुंडेंवर निशाणा साधला.

धनंजय मुंडे म्हणाले, माझ्या बहिणीने लहान मुलांच्या चिक्की खाल्या तसेच विनोद तावडे यांनी महापुरूषांच्या फोटोत पैसे खाल्ले राज्यात ९० हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याचे पुरावे मी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले. मात्र त्यावर मुख्यमंत्री गप्प आहेत. धनंजय मुंडे यांनी बहिणीवर जोरदार आरोप केले. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाराष्ट्राला फसविले. असेही मुंडे म्हणाले.

3 Comments

Click here to post a comment