पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तांतर होईल आणि पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. निवडणूक निकालाच्या आधारावर सर्व पक्ष एकत्र येऊन एक किमान समान कार्यक्रम तयार करतील आणि नवं सरकार स्थापन होईल, असंही पवार म्हणाले. ते आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या ‘मुंबई मंथन’ कार्यक्रमात बोलत होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, असा दावा शरद पवारांनी केला. ‘देशातील जनतेला परिवर्तन हवं आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीनंतर देशात आघाडी सरकार स्थापन होऊ शकतं. मोदी त्यांच्या पक्षाचे सर्वात शक्तिशाली नेते आहेत. मात्र त्यांना देशाचे सामर्थ्यशाली नेते मानण्याची चूक करु नका,’ असं शरद पवार म्हणाले. पुढील निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असं भाकितदेखील त्यांनी वर्तवलं.

You might also like
Comments
Loading...