“सामान्य लोकांच्या कामासाठी अधिकार्‍यांवर माझा दबाव”- रोहित पवार

मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्य सरकारमधील नेते आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पहायला मिळत आहेत. दरम्यान, भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात जाऊन जोरदार निशाणा साधला आहे. रोहित पवारांकडून मतदारसंघातील कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांवर दबावतंत्र सुरु असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. रोहित पवार यांनी या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे.

“कर्जत-जामखेड तालुक्यातील एक तरी सरकारी अधिकारी हसताना दिसतो का? त्यांच्या चेहऱ्यावर कायमच गांभीर्य असतं. तालुक्यात एक नाही तर दहा आमदार आहेत, कारण आमदारांना पीएच तेवढे काय ते आहेत,” असा टोला खासदार सुजय विखेंनी आमदार रोहित पवारांना लगावला आहे. कर्जत जामखेड तालुक्यातील शिरपूर येथे एका सभेत खासदार सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या: