माझा पक्ष कधीच भाजपमध्ये विलीन करणार नाही – महादेव जानकर

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत रासपच्या वाटय़ाला केवळ एक जागा आली. त्यावर आपण समाधानी असल्याचे सांगत, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपला पक्ष भाजपमध्ये कधीच विलीन करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

आमचे आमदार, पदाधिकारी फुटून भाजपमध्ये गेले. त्याचा दोष भाजपला देणार नाही. ती त्या कार्यकर्त्यांची चूक आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाजवादी पक्षाची अवस्था ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी झाल्याची कबुली देतानाच आमचा पक्ष भाजपमध्ये कधीही विलीन केला जाणार नाही, असा दावा ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला.

नाशिक पश्चिम मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ जानकर यांच्या उपस्थितीत मोटारसायकल फेरी काढण्यात आली. या ठिकाणी सेनेच्या बंडखोरीमुळे भाजपने सर्व नेत्यांना प्रचारार्थ धाडण्यावर भर दिला आहे. दुचाकी फेरीत सहभागी झाल्यानंतर जानकर यांनी भाजप कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या