‘अलीगढशी माझे जुने नाते’, मोदींकडून बालपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा

अलीगढ : २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण आतापासूनच तेथील राजकीय वातावरण गरम झाले आहे.. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाने तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. अलीगढ येथे मोदी यांनी राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या कोनशीलाचे अनावरण केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींनी उजाळा दिला. ते म्हणाले, ‘एक मुस्लिम व्यक्ती होती. जे दरवर्षी तीन महिन्यांसाठी आपल्या गावी येत होते. कुलुप विक्री करण्यासाठी ते आमच्याकडे यायचे. माझ्या वडिलांसोबत त्यांची चांगली मैत्री झाली. दिवसभरात जी काही कमाई व्हायची ती वडिलांकडे द्यायचे. अलीगढला परत जाता ते वडिलांकडून पैसे घ्यायचे’.

बालपणीपासून उत्तर प्रदेशातील दोन शहरांची ओळख आहे. डोळ्याला काही इजा झाली, आजार असेल तर सीतापूरला जायची चर्चा व्हायची. याशिवाय वडिलांचा मित्र असलेल्या मुस्लिम व्यक्तीमुळे अलीगढचं नाव कानावर पडत असत. हल्ली कुलपांशिवाय शस्त्रांसाठीही अलीगढला ओळखू. कुलपांमुळे घराचे संरक्षण होते तर शस्त्रांनी देशाच्या सीमेचं संरक्षण होईल अशा भावना मोदींनी यावेळी व्यक्त केल्या.

दरम्यान, याप्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही भाषण केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत असताना मोदींच्या नेतृत्वात भारत पुढे जात आहे. मोदींच्या नेतृत्वातील भारत जगासमोर आदर्श झाला आहे, उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढली आहे. आतापर्यंत १ कोटी ६१ कोटींना रोजगार दिल्याची माहिती योगींनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या