ग्रामीण भागाला डिजिटल साक्षर बनवणारे ‘माय नुक्कड’ अभियान

my-nukkad-campaign-helps-to-digital-literate-for-rural-areas

पुणे: २१ व्या शतकामध्ये देशात डिजिटल युगाचा नारा दिला जात आहे. मात्र, आजही ग्रामीण भागापर्यंत डिजिटल साक्षरता पोहचवण्यात काहीअंशी अपयश आल्याच दिसून येत. याची मुख्य कारणे म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच अभाव, ग्रामीण भागात असणारी विजेची कमतरता आणि शासकीय योजना तळागळापर्यंत पोहचवण्यात उदासीन असणाऱ्या सरकारी यंत्रणा. दरम्यान, हे चित्र बदलण्यासाठी कामी येत आहे ते माय नुक्कड अभियान.

‘माय नुक्कड’ आणि ‘गिफ्ट अ फॅमिली’ या सॉफ्टवेअरच्या मदतीने ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल माध्यमामध्ये आर्थिक, भाषा आणि उद्योजकता साक्षर बनवण्याचा उपक्रम राबवला जात आहे. या दोन्ही सॉफ्टवेअरची निर्मिती पॅशन इन्फोटेक पुणे यांच्याकडून करण्यात आलेली आहेत. पुणे जिल्हातील वडगाव शिंदे गावामध्ये नुकतेच ५ दिवसांचे माय नुक्कड अभियान राबवण्यात आले होते. यामध्ये संगणकाची प्राथमिक माहिती ते इंटरनेटचा वापर तसेच मोबाईल आणि ऑनलाईन बँकिंग कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले.

याबद्दल बोलताना माय नुक्कड अभियान राबवणाऱ्या पूजा वैद्य म्हणाल्या कि, शहरी भागामध्ये सर्वकाही डिजिटल होत असतांना आजही ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी डिजिटल साक्षरतेचा अभाव दिसून येतो. हीच गरज ओळखून आम्ही नागरिकांना विशेषत:हा महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामात वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देत आहोत. या अभियानच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळण्यात देखील मदत होत आहे.

घरबसल्या उघडा स्टेट बँकेत खाते !