माझे नाव मनोहर कुलकर्णी नाही तर, संभाजी भिडेच

sambhaji bhide guruji

पुणे: कोरेगाव भीमा प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारदार असणारे संजय भालेराव यांनी भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करताना मनोहर विनायक कुलकर्णी (वय 59) असे सांगितले आहे. मात्र, हे नाव चुकीचे असून संभाजी भिडे (वय 81) असे असल्याने ते दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी भिडे यांच्या वकिलाने न्यायलयात केली आहे.

तक्रारदार संजय भालेराव यांची इनोव्हा कार दंगलीत जळाल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. भालेराव यांच्याकडून भिडे गुरुजी यांच्या ब्रेनमॅपिंग तसेच पॉलिग्राफ टेस्टची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रथमच भिडे यांच्या वकिलाकडून बाजू मांडण्यात आली. यामध्ये युक्तिवाद करताना भिडे यांचे नाव मनोहर विनायक कुलकर्णी नसून संभाजी भिडेच असल्याचे न्यायालयात सांगितले आहे.

दरम्यान, तक्रारदार भालेराव यांनी तक्रारीमध्ये भिडे यांच्याविरोधातील व्हिडिओ फुटेज, , व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग, कोरेगाव-भीमा संर्दभातील पत्रके, फोटो असल्याचे सांगितले होते. यावर त्यांची प्रत देण्याची मागणी भिडे यांच्या वकील अ‍ॅड. पुष्कर दुर्गे यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने अ‍ॅड. दुर्गे याची मागणी मान्य करत तक्रारदाराला त्यांच्याकडील माहिती भिडे यांच्या वकिलांना देण्याचे आदेश दिले आहेत.