fbpx

माझी आई अनेक भारतीयांपेक्षा जास्त भारतीय – राहुल गांधी

बंगळुरु –  कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बंगरुळात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली.

राहुल यांनी हातात कागद न घेता कोणत्याही भाषेत 15 मिनिटं बोलावं, वाटल्यास मातृभाषेत बोलावं, अशी टीका मोदींनी राहुल गांधी यांच्यावर केली होती. दरम्यान राहुल गांधी यांनी आज मोदींच्या या टीकेला चोख उत्तर दिलं.

‘माझी आई इटालियन आहे. पण तिने आयुष्यातील मोठा काळ भारतात घालवला आहे. अनेक भारतीयांपेक्षा ती जास्त भारतीय आहे. माझ्या आईने देशासाठी मोठा त्याग केला आहे आणि खूप काही सहन केलं आहे. जर पंतप्रधानांना माझ्यावर अशी टिप्पणी करुन आनंद मिळतो, तर त्यांनी करत राहावं.’ असं राहुल गांधी यांनी म्हंटले आहे. तसेच ‘ही निवडणूक कर्नाटकची आहे. मी पंतप्रधान बनण्याची किंवा माझ्या भविष्याची नाही’ असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.