माझ्या पतीने झायराची छेड काढली नाही – दिव्या सचदेव

मुंबई : विमान प्रवासादरम्यान माझ्या पतीने झायरा वसीम छेडछाड केली नाही. झोपेत असतांना त्यांचा चूकुन पाय लागल्याचे आरोपी विकास सचदेव यांच्या पत्नी दिव्या सचदेव यांनी सांगितले. विकास सचदेवला अटक केल्यानंतर त्याच्या पत्नीने यावर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

माझे पती निर्दोष आहेत. त्यांच्या छेडछेड करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. आमच्या कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू झाल्यामुळे ते तिकडे गेले होते. या धावपळीत त्यांना जवळपास २४ तास झोप मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांना झोप घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी विमान कर्मचाऱ्यांनाही त्रास न देण्याची सूचना दिली असल्याचे तिने म्हटले आहे. मात्र त्यांचा झोपेत असतांना झायराला पाय लागला असून यातून झायराचा काहीतरी गैरसमज झाला असू शकतो असे ही त्यांनी यावेळी सांगितले.