माझ्या मैत्रिणीला अखेर न्याय मिळाला: सुप्रिया सुळे

supriya sule with kannimoli

टीम महाराष्ट्र देशा: 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याचा आज अखेर निकाल लागला आहे. यामध्ये ए राजा, कानिमोळी सह अन्य आरोपोंची निर्दोष मुक्तता झाली आहे. यामध्ये डीएमकेच्या माजी खासदार कनिमोळी यांची 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला. सुप्रिया सुळेंनी ट्वीट करुन, मैत्रीण निर्दोष सुटल्याचे सांगत न्याय मिळाल्याची भावना बोलून दाखवली.

2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी एकूण तीन खटले सुरु आहेत. त्यापैकी दोन सीबीआयकडे आणि एक अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. त्यापैकी ए. राजा यांच्याशी संबंधित खटल्यात सीबीआय कोर्टाने सर्व 17 आरोपींना निर्दोष मुक्त केले. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री ए. राजा, डीएमकेच्या माजी खासदार कनिमोळी यांचाही समावेश आहे.’माझी मैत्रीण कन्नीसाठी मला खूप आनंद झालाय. अखेर न्याय मिळाला’, अशा शब्दात भावना व्यक्त करत सुप्रिया सुळेंनी कनिमोळींसोबतचा फोटोही ट्वीट केला आहे.