श्रीरामपूरमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानास प्रारंभ!

nagar

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन अनेक उपक्रम राबवित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर मात करण्यासाठीचे माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. श्रीरामपूर येथे या उपक्रमाचा शुभारंभ काळाराम मंदिर परिसरात नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, नगरसेवक रवी पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडधे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

दिवसेंदिवस श्रीरामपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत आशा आरोग्य सेविका शहरातील प्रत्येक घरी जावून कुटूंबांतील प्रत्येक सदस्याची तपासणी करणार आहे. ताप, खोकला, ऑक्सिजन लेव्हल याची तपासणी होईल.ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतील त्यांची तातडीने तपासणी करण्यांत येईल. जर तपासणी अहवाल पाॅझीटिव्ह आला तर त्यास डाॅक्टरांच्या सल्यानुसार दवाखान्यात दाखल केले जाईल. तसेच घरातील सदस्यांना मधूमेह, रक्तदाब व इतर आजार असतील त्याचीही नोंद करण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कसा टाळावा यासंबंधीची माहिती नागरिकांना नगरपरिषदेमार्फत दिली जाणार आहे. त्यामुळे या उपक्रमास सर्व शहरवासियांनी सहकार्य करावे व आपली तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले आहे. याप्रसंगी शैलेश बाबरिया, राहुल सराफ, डाॅ.सचिन पर्‍हे, डाॅ.संकेत मुंदडा, डाॅ.उन्मेश लोंढे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-