माझा चेहरा पूर्वीसारखाच फ्रेश : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभेच्या निकालानंतर सत्ता गेल्याने मला कोणताही धक्का बसलेला नाही, तसेच माझा चेहरा आहे तसाच फ्रेश आहे आणि मला सावरण्यासाठी आई अंबाबाई समर्थ आहे, त्यासाठी हसन मुश्रीफ यांची गरज नाही, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आज भाजपाच्यावतीने पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवले पण हा राज्य पातळीवरील प्रश्न आहे, ते तर राज्यमंत्री आहेत, त्यांना कॅबिनेटमध्ये बसायलाही परवानगी नाही, मग ते हा प्रश्न कसा सोडवणार ? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

Loading...

विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील घडलेल्या राजकीय घडामोडींचा मोठा धक्का चंद्रकांत पाटील यांना बसला आहे. त्यांना यातून सावरण्याची शक्ती देवाने द्यावी अशी टीका गेल्या आठवड्यात हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, राज्याचा प्रश्न इथे चर्चा करून कसा सोडवणार ? त्यांची तेवढी क्षमता आहे का?  इथे चर्चा करून ते राज्याचा प्रश्न कसा सोडवतील? हा राज्यव्यापी प्रश्न आहे, राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. गृहराज्यमंत्री हे कॅबिनेटमध्येही नाहीत असा टोला पाटील यांनी सतेज पाटील यांना लगावला.

मुश्रीफ यांच्यावर टीका करताना श्री. पाटील म्हणाले, निवडणुकीच्या निकालापासून माझा चेहरा आहे तसाच आहे, मला कोणताही धक्का बसलेला नाही. पाच वर्षे तुमचा चेहरा मात्र कोमेजलेला होता. मला सावरण्यासठी आई अंबाबाई समर्थ आहे, त्यासाठी मुश्रीफ यांची गरज नाही.’

यावेळी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, भगवान काटे आदि उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात