fbpx

मला मंत्रिपदाचा अनुभव असल्यानेच माझ्यावर जबाबदारी – जयदत्त क्षीरसागर

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या एका महिन्यात मंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर नवनिर्वाचित रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्यावर उद्धव ठाकरे यांनी जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मनात असल्याचे सांगत मला मंत्रिपदाचा अनुभव आहे म्हणूनच पक्षप्रमुखांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे, आणि राज्याचे प्रमुख मला जे खाते देतील त्या खात्याचा कारभार मी उत्कृष्ट पद्धतीने करणार असल्याचे मत जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, राज्यातील आज विरोधकांनी आता गोळा बेरीज करणे गरजेचे आहे. त्यांचा विचार जनतेने केला आहे. जनतेने लोकसभेत विरोधकांचा कशा प्रकारे पालापाचोळा केला हे त्यांनी पाहिल असल्याचे मत जयदत्त क्षीरसागर यांनी मांडले.