भाजपची सत्ता येण्यात माझाही खारीचा वाटा : एकनाथ खडसे

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसच्या सत्ताकाळात विरोधीपक्ष नेता म्हणून दिलेली जबाबदारी मी चोख पार पाडली. जनतेच्या मनात सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करून आपल्या पक्षाची सत्ता आणण्याचं काम विरोधीपक्ष नेत्याचं असतं. ते काम मी चोखपणे पार पडले त्यामुळे भाजपची सत्ता येण्यात मी केलेल्या कामाचा खारीचा वाटा आहे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेचे नवे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांचे अभिनंदन केले.

विधानसभा विरोधी पक्षनेते पदी अखेर कॉंग्रसचे विजय वड्डेटीवार यांची वर्णी लागली आहे. यावेळी सभागृहातील सर्व सदस्यांनी वड्डेटीवार यांचे अभिनंदन केले. तर भाजप नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार भाषण केले. यावेळी खडेस म्हणाले की, माझं आयुष्यच विरोधी पक्षात गेलं. मी बराचकाळ विरोधीपक्षनेता म्हणून काम पाहिलं. विरोधीपक्ष नेत्याला सरकारच्या चुकीच्या कामांवर आसूड ओढतानाच चांगल्या कामाचं कौतुक करता आले पाहिजे. जे मी केलं. जनतेच्या मनात सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करून आपल्या पक्षाची सत्ता आणण्याचं काम विरोधीपक्ष नेत्याचं असतं. माझ्या पक्षाने विरोधीपक्ष नेता म्हणून दिलेली जबाबदारी मी चोख पार पाडली. भाजपची सत्ता येण्यात मी केलेल्या कामाचा खारीचा वाटा आहे.

दरम्यान नुकतेच भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने कॉंग्रेसकडून वड्डेटीवार यांना संधी देण्यात आली, मात्र कॉंग्रेसला विरोधी पक्षनेते पद हवे असल्यास विधानपरिषदेचे उपसभापती पद युतीला सोडण्याची अट घालण्यात आली होती.