दक्षिण नगर मधून माझी लोकसभेची उमेदवारी निश्चित : डॉ. सुजय विखे-पाटील

अहमदनगर ;स्वप्नील भालेराव : सर्वसामान्य जनता व तरूणांच्या पाठबळावर आपण येत्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण नगर मतदार संघातून निवडणूक लढवणार असून  जनतेच्या पाठींब्यामुळे माझी  उमेदवारी निश्चित आहे असे मत डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केले.

शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक येथे डॉ.सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थ व तरूणांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. जनसंघर्ष यात्रेच्या जनजागृतीसाठी डॉ. विखे हे शेवगाव तालुक्यात आले होते. या वेळी वडुले बुद्रुकचे सरपंच प्रदीप नानासाहेब काळे यांनी स्वखर्चातून सुरू केलेल्या शिवम हेल्थ क्लब या व्यायामशाळेची डॉ.विखे पाटील यांनी पाहणी केली.

शेवगाव नगर परिषदेचे नगरसेवक सागर फडके, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अजय रक्ताटे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे आदी उपस्थित होते. सरपंच प्रदीप काळे यांनी डॉ.विखे पाटील यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

जनतेतून प्रथमच वडुले बुद्रुक गावचे सरपंच म्हणून निवडून आल्याबद्दल सरपंच प्रदीप काळे यांचा डॉ.विखे पाटील यांनी सत्कार केला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची आपणास जाण आहे. ते प्रश्न मार्गी लावण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू, असे या वेळी डॉ.विखे पाटील यांनी या वेळी सांगीतले.

नेवासा तालुक्यात मुरकुटे गटाला चार तर गडाख गटाला तीन ग्रामपंचायती

शनी शिंगणापुर ग्रामस्थ व उपोषणकर्त्यांच्या रेट्यापुढे  देवस्थान प्रशासन अखेर झुकले