fbpx

माझा भाऊ पवारांची चमचेगिरी करतो : पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. यामध्ये राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर लोकसभा जागेसाठी भाजपने सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे आल्या असता त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

आमचे बंधु पवारांची लाचारी आणि चमचेगिरी करतात, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाना साधलाय. पार्थ की रोहित असं विचारल्यावर फक्त पवार असं ते उत्तर देतात. मला त्यांना विचारायचंय. अरे किती दिवस तुम्ही पवारांची लाचारी करणार? असं पंकजा म्हणाल्या.

दरम्यान, आमच्यावर आक्षेप घेणाऱ्या दरिद्री लोकांना आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या, असं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं.