‘माझा मुलगा जसा मोठा झाला, तसा हो, माझा आशिर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी राहिल’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी घवघवीत यश मिळवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पराभव करत दिल्लीमध्ये धडक मारली आहे. तर आज धैर्यशील माने यांनी थेट राजू शेट्टी यांच्या घरी जावून राजू शेट्टी यांची गळाभेट घेतली असून यावेळी शेट्टींच्या आईने धैर्यशील माने यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देखील दिले.

माझा मुलगा जसा मोठा झाला, तसा हो, माझा आशिर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी राहिल, असा आशिर्वादही राजू शेट्टी यांच्या आईने धैर्यशील माने यांना दिला.यावेळी शेट्टी यांनीही माने यांना लोकसभेमध्ये चांगले प्रश्न मांडावेत असा सल्ला दिला. माझ्या घरी आल्यामुळे मला खूप आनंद झाला, जनतेने दिलेला कौल स्वीकारला पाहिजे, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.