माझा आणि राहुल गांधींचा एकमेकांच्या खांद्यावर हात – संजय राऊत

sanjay raut and rahul gandhi

मुंबई : महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद धुमसत असल्याचं अनेकदा समोर आल्यानंतर मागील काही महिन्यांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची चांगलीच जवळीक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनावेळी विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी मोदी सरकारची कोंडी केली होती. यावेळी संजय राऊत आणि राहुल गांधी हे चर्चा करत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. गांधींनी राऊतांच्या खांद्यावर हात ठेवल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

दरम्यान, राहुल गांधींसोबतच्या मैत्रीवर संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाष्य केलं आहे. ‘सध्या आमचे एकमेकांच्या खांद्यावर हात आहेत,’ असं ते म्हणाले. यावर त्यांना राहुल गांधींनी खांद्यावर हात ठेवल्यामुळेच नाना पटोले यांची स्वबळाची आक्रमक भूमिका मवाळ झाली का असा सवाल करण्यात आला. यावर त्यांनी जोरदार हास्याची प्रतिक्रिया दिली.

‘राहुल गांधी मला अधून- मधून फोन करत असतात. माझी परखड मतं मांडत असतो. मला काही इंटरेस्ट नसतो. कोणी मतं मागितली तर पक्षपात न करता मी मतं देत असतो. आमच्या खांद्यावर हात टाकल्याने कुणाला पोटात दुखायचं कारण नाही. निर्बंध सैल झाल्यावर मुलाखतींचा सिलसिला सुरु होईल. येत्या काळात सामना दैनिकात राहुल गांधी यांचीही मुलाखत वाचायला मिळू शकते,’ असे स्पष्ट संकेत देखील संजय राऊत यांनी दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या