MVA | मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाच्या नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली. तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मईंची विधान, राज्यातील प्रकल्पांची पळवापळव, महागाई आणि बेरोजगारी या विरोधात आज ( १७ डिसेंबर ) ‘महाविकास आघाडी’च्या वतीने ‘महामोर्चा’चे आयोजन करण्यात आलं आहे. सरकार विरोधात काढलेला ‘महामोर्चा’ कसा असणार आहे याची झलक दाखवणारे व्हिडीओ महाविकास आघाडीच्या वतीने शेअर करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीकडून व्हिडीओ शेअर
”महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरुषांविषयी सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यातून त्यांचा केलेला अवमान, बेरोजगारी अशा असंख्य गोष्टींचा जाब या राज्य सरकारला विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल’ हा मोर्चा पुकारण्यात आला आहे”, अशा कॅप्शनसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरुषांविषयी सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यातून त्यांचा केलेला अवमान, बेरोजगारी अशा असंख्य गोष्टींचा जाब या राज्य सरकारला विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून 'महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल' हा मोर्चा पुकारण्यात आला आहे. pic.twitter.com/vJ6wq6ZKFc
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 16, 2022
काँग्रेसचं ट्विट
महाराष्ट्र आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हल्लाबोल महामोर्चा. आपणही जरुर सहभागी व्हा!, असं ट्विट काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हल्लाबोल महामोर्चा.
आपणही जरुर सहभागी व्हा!#महामोर्चा pic.twitter.com/KO4f11BHKe
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 17, 2022
गद्दारांना गाडण्यासाठी निष्ठावंत तयार असं म्हणत शिवसेनेनं देखील एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
गद्दारांना गाडण्यासाठी निष्ठावंत तय्यार!#HallaBol #हल्लाबोल #MaharashtraPrem #Maharashtra pic.twitter.com/kvaAJrk7M7
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) December 17, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “शिंदे सरकारचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली चिरडलंय”; संजय राऊत यांचा घणाघात
- Rupali Patil | “ईडी आणि सीबीआयची कारवाई होऊ नये म्हणून शिंदे गटातील आमदार…”; रुपाली पाटलांचा दावा काय?
- Shambhuraj Desai | हिवाळी अधिवेशन संपताच बेळगावात जाऊन चर्चा करु – शंभूराज देसाई
- Nana Patole | “भाजपाचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”; नाना पटोलेंचा घणाघात
- Bacchu Kadu | महापुरुषांबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याला रट्टा दिला पाहिजे – बच्चू कडू