MVA | मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. यामध्ये तुरुंगवास भोगत असलेले अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. तर जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ खडसे यांच्यासह अनेकांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. नवे सरकार आल्यावर पूर्वीच्या सरकारमध्ये सुरक्षा उपभोगणारे माजी मंत्री, सत्ताधारी यांच्या सुरक्षेत बदल केले जातात. त्यानुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात देखील महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे.
यामध्ये महाविकास आघाडीच्या 25 नेत्यांची सुरक्षा कमी किंवा काढून टाकण्यात आली आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंब आणि शरद पवार यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाय स्तरावर वाढवण्यात आली आहे. नार्वेकरांनी सुरक्षा वाढवल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहेत. यावरून काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असेल, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा यामुळेही वाढवली असेल, की त्यांना खरच धोका असेल. दुसरं म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ते कुठे जातात? कोणाला भेटतात हे कळण्यासाठी देखील त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असेल असं सतेज पाटील म्हणालेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होत. नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेलं ट्विट देखील बरंच चर्चेत आलं होत. आता पुन्हा एकदा नार्वेकर यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्यानं नार्वेकर शिंदे गटात जाण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Bachhu Kadu । “मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं, पण…”; बच्चु कडूंचा मोठा खुलासा
- Bachhu Kadu । “आधी मला लोक विरूवाले आमदार म्हणायचे, मग भिडू, आता खोकेवाले…”; बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत
- Bacchu Kadu | “आजही मला ठाकरेंबद्दल आस्था पण…”; बच्चू कडू यांनी शिंदेंसोबत जाण्याचे सांगितले कारण
- Government Job Recruitment | भारतीय गुप्तचर विभाग IB यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Explained | शिंदे -फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्र कंगाल, गुजरात मालामाल! हे मोठे प्रकल्प केले दान