मुजफ्फरपूर मधील आरोपींची गय केली जाणार नाही : नीतिश कुमार

टीम महाराष्ट्र देशा : बिहार येथील मुजफ्फरपूरमध्ये ३४ मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान या प्रकरणात राजकारण आणणं चुकीचं आहे. सरकारने या प्रकरणात आधीच तपासाला सीबीआय मार्फत सुरुवात केली आहे. तरी देखील आम्ही मौन बाळगून आहोत असा आमच्यावर आरोप केला आह्रे. हा तपास उच्च न्यायालयाच्या अंतर्गत व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींंवर कडक कारवाई केली जाईल. आणि आमच्या पक्षातील जरी यात दोषी आढळला तरी त्याची गय केली जाणार नाही असे नीतिश यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केल आहे.

दरम्यान मुजफ्फरपूर प्रकरणात बिहारच्या सामाजिक कल्याण मंत्री मंजु वर्मा यांनी ब्रजेश ठाकूर संचालित असलेल्या या बालिकाश्रमाची पाहणी केली होती. आणि सर्वकाही ठीक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे हे देखील यात सहभागी असल्याचा आरोप होत आहे. त्यानंतरही या प्रकरणावर नीतिश यांनी बाळगलेल्या मौनामुळे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्याला वाचवण्यासाठीच नीतिश गप्प बसले आहेत, अशी टीका  विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत होती.  त्यानंतर हे प्रकरण उघडकीला आलं. त्यानंतर अखेर आज  नितीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी आपली आणि पक्षाची बाजू स्पष्ट केली.

…तथ्य आढळलं तर पंकजा मुंडेंची चौकशी करु : मुख्यमंत्री

पोलीस बंदोबस्तात छिंदमची पालिकेच्या सभेला हजेरी