fbpx

‘जिनांचा’ फोटो हवा असणारे विद्यार्थी बापाचा अपमान करणारे – व्ही. के. सिंह

v k singh

नवी दिल्ली – तुम्ही मुस्लिम आहात आणि भारतात वास्तव्य करत आहात आणि तरीही तुम्हाला मोहम्मद अली जिना यांचा फोटो अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या भिंतीवर हवा आहे तर तुम्ही तुमच्या वडिलांचा आणि आजोबांचा अपमान करत आहात, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी दिली आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्या फोटोवरून वादंग निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर जिना यांनी आपली प्रतिकिया दिली.

जिना यांनी म्हंटले आहे की, तुम्ही मुस्लिम आहात आणि तरीही तुम्हाला जिना यांचा फोटो भिंतीवर हवा आहे तर हा तुमच्या वडिलांचा आणि आजोबांचा अपमान आहे. ज्या पिढीने जिना यांचे विचार नाकारले त्या पिढीचा तुम्ही अपमान करत आहात. तुम्ही मुस्लिम नसाल आणि तरीही तुम्ही जिना यांचा फोटो भिंतीवर असावा या भूमिकेला समर्थन देत असाल तर तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा अशी माझी विनंती आहे. तुम्ही तुमच्या घरात अशा व्यक्तीचा फोटो लावाल का ज्या व्यक्तीचे हात तुमच्या स्वकियांच्या रक्ताने रंगले आहेत. असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली विवेकबुद्धी जागृत ठेवायला हवी. कोणत्याही कट्टरपंथीय विचारांना बळी पडू नये. स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे यात काहीही शंका नाही. मात्र जे स्वातंत्र्य आपण आज उपभोगतो आहोत ते मिळवण्यासाठी ज्या महापुरुषांनी प्राणांची बाजी लावली त्यांचे ते बलिदान आपण विसरुन जातो. आपल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करतो आहोत का? ज्या प्रकारे स्वातंत्र्य उपभोगले जाते आहे ते पाहून महापुरुषांना गर्व वाटेल का? याचे भान विद्यर्थ्यांनी ठेवायला हवे असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.