fbpx

मुस्लिमांनो एकगठ्ठा काँग्रेसला मतदान करा : सिद्धू

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने वाचाळवीर नेत्यांसाठी आचारसंहिता लागू केली असतानाच काँग्रेसचे स्टार प्रचारक नवज्योत सिंह सिद्धू यांनी अजब विधान केले आहे. मुस्लिम समुदायामध्ये फूट पाडण्यासाठी मतांचे विभाजन करण्यासाठी एमआयएमसारखी पार्टी अस्तित्त्वात आली आहे. मुस्लिमांनी एकत्र येत एकजूट दाखवली तर नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होईल असं विधान नवजोत सिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहार येथे जनसभेला संबोधित करताना केलं आहे.

नेमकं काय म्हणाले सिद्धू ?

येथे जातीपातींचे राजकारण सुरू आहे. म्हणूनच मी मुस्लीम बांधवांना सांगू इच्छितो की तुम्ही अशा क्षेत्रात वास्तव्यास आहात जिथे तुम्ही अल्पसंख्याक नाही तर बहुसंख्याक म्हणून रहाल. या क्षेत्रात तुमचे वर्चस्व 62 टक्के आहे. पण कारस्थानी लोक तुमच्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही एकजूटीने राहाल तर जगातील कोणतीही शक्ती काँग्रेसला पराजित करू शकणार नाही.