मुस्लिमांनी भारतात राहू नये, पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये जावं- भाजप खासदार

viny katariya

नवी दिल्ली : भाजपचे नेते दिवसेंदिवस वादग्रस्त विधान करत आहेत. भाजप खासदार विनय कटियार यांनी मुस्लिमांनी भारतात राहू नये, तर थेट पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावं असं वादग्रस्त विधान केल आहे.

भारतीय मुस्लिमांना ”पाकिस्तानी” संबोधणाऱ्या व्यक्तींना तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्याचा कायदा करावा, अशी मागणी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काल लोकसभेत केली होती. त्याला विनय कटियार यांनी उत्तर दिल्याचे समजते.

काय म्हणाले खासदार विनय कटियार?

‘मुस्लिमांनी या देशात राहता कामा नये. लोकसंख्येच्या आधारावर त्यांनीच आपल्या देशाचं विभाजन केलं. मग त्यांना इथे राहण्याची गरजच काय? त्यांना स्वतंत्र प्रदेश देण्यात आला आहे. त्यांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये जावं. त्यांचं इथे काम काय?Loading…
Loading...