बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील मुस्लिम होणार आता भारतीय

टीम महाराष्ट्र देशा : बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील गैर- मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेले नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९, मंगळवारी (दि.८) लोकसभेत मंजुर करण्यात आले. हे विधेयक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडले होते. या विधेयकावरून लोकसभेत गदारोळ झाला. तरीही ते अखेर मंजूर झाले आहे.

अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश यासारख्या देशांतील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने हे विधेयक आणले. या देशांतील नागरिकांचे भारतातले वास्तव्य जर सहा वर्षांपेक्षा अधिक आहे. अशा लोकांना आता देशाचे नागरिकत्व देण्याचा मार्ग या विधेयकामुळे मोकळा झाला आहे.