सवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर

टीम महारष्ट्र देशा : नववर्षाच्या सुरवातीलाच मोदी सरकारने सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा लोकप्रिय निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे समाजातील अनेक वर्गांना या आरक्षणाचा शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये फायदा होणार असल्याची सर्वत्र चर्चा असतानाच प्रकाश आंबेडकरांनी आरक्षणाचा फायदा हा केवळ मुस्लिमांना होणार असल्याचे मत स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निर्णयाचा फटका भाजपलाच बसणार असल्याचं देखील ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “ सवर्ण आरक्षण लागू होण्यासाठी ज्या काही अटी घालण्यात आल्या आहेत त्या अटींनुसार या आरक्षणाचा फायदा हा केवळ मुस्लिमांना होणार आहे. १००० चौ.मी. पेक्षा कमी क्षेत्रफळाचे राहते घर, ८ लाखा पेक्षा कमी उत्पन्न या आरक्षण लागू होण्याच्या अटींनुसार मुस्लिम समाज या वर्गात मोठ्या प्रमाणात मोडत असल्याच दिसून येत आहे त्यामुळे या आरक्षणाचा फायदा मुस्लिम समाजाला सर्वाधिक होणार आहे. आणि याचा सर्वाधिक धोका भाजप पक्षाला आहे.”
तसेच मुस्लिम समाजाला जर याचा फायदा होत असेल तर आम्हाला आनंदचं आहे. असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले

You might also like
Comments
Loading...