‘मुस्लीम प्रोटीनयुक्त आहार घेतात, हिंदूंनीही अंडी-मटन खावे’, आ.संजय गायकवाडांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

बुलडाणा : काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर असभ्य भाषेत टिका केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. बुलडाणा जिल्ह्यात तर हाणामारीपर्यंत हे प्रकरण गेले. दरम्यान, ते प्रकरण शांत होते न होते तेच आ.गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

‘कोरोना काळात मंदिरे बंद आहेत, तुम्हाला वाचवण्यास कोणी येणार नाही. उपास-तापास बंद करा, अंडे-मटन खा, मुस्लिमांमध्ये कोरोनामुळे क्रिटिकल होण्याचे प्रमाण कमी आहे, कारण ते सातत्याने प्रोटीनयुक्त आहार घेत असतात असे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले. त्यामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट निर्माण झाली असून निषेध करतच अनेकांनी आमदार गायकवाड यांनाच फोन लावले अन् ते टॅप केलेले फोन सर्वत्र व्हायरल केलेत.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात आमदार संजय गायकवाड यांनी कोरोनाच्या संकटावर बोलताना अंडे व मटन खाण्याची आपली भूमिका मांडली होती. त्यात त्यांनी हिंदु समाजात शाकाहारींची संख्या खूप आहे. त्यातच अनेक महिला-भगिनी उपास, व्रत धरतात. त्यांच्या शरीराला पोषक तत्वे मिळत नाही. रोगप्रतिकार शक्ती कमी होते. परिणामी कोरोनामुळे मृत्यू होतो. पण दररोज चार अंडे खाल्ले आणि किमान एक दिवसाआड चिकन, मटन खाल्ले तर कोरोनाला आपण हरवू शकतो, असे सांगत प्रोटीनयुक्त आहार घेण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. यामुळे एका नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP