भाजपात प्रवेश केलेल्या मुस्लीम महिलेला भाड्याचे घर खाली करण्यास सांगितले

bjp-flag-representational-image

अलीगढ – भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून अलीगढ येथील मुस्लीम महिलेला भाड्याचे घर खाली करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आला आहे. पिडीत महिलेने या संदर्भातील तक्रार पोलिसांकडे दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे.

‘मी काल भाजपमध्ये प्रवेश केला. जेव्हा माझ्या घरमालकिणीला ही बाब माहीत झाली, तेव्हा मला ताबडतोब घर सोडण्यास सांगितले,’ अशी माहिती माध्यमांना गुलिस्ताना या पिडीत महिलेने दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरमालकाच्या आईने विजेचे बिल भरण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी केली त्यानंतर पक्षात प्रवेश केल्याच्या मुद्यावरून जोरदार भांडण केलं. याप्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे,’ अशी माहिती अलीगढचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आकाश कुल्हारी यांनी दिली. देशात असहिष्णुता वाढल्याचा कांगावा करणारी मंडळी उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील घटनेवर सोयीस्करपणे मौन बाळगून असल्याने आश्चर्य वयात केले जात आहे.